‘सर्टिफाईड कॉपी’ : स्त्रीच्या दडपलेल्या वेदनेचा वैश्विक आविष्कार
पहिल्या पाहण्यात हा एक बुद्धिगम्य सिनेमा वाटतो. पण दुसऱ्या, तिसऱ्या पाहण्यात त्याच्या खोलवरच्या अर्थच्छटा जाणवू लागतात. हा सिनेमा सोपी उत्तरं देत नाही, पण खूपसे प्रश्न उभे करतो. हा सिनेमा समजणं इतकं महत्त्वाचं राहत नाही, पण समजून घेण्याचा प्रयत्न महत्त्वाचा होतो. कुठलीही कला/कलाकृती ही अनेक शक्यतांसाठी खुली असते. दिग्दर्शक जणू एक जादूचा प्रयोग दाखवतो आणि आपण टाळ्या वाजवायचं विसरून स्तब्ध होतो.......